Thursday, October 31, 2019

अझोला एक पशुखाद्य

 
Saurabhskedar

 अझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. अझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते आहे. पशुपालनासाठी अझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहेत. आजच्या परिस्थितीत युवकांची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील महिला व पुरुष बचत गट यांनासुद्धा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय एक प्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. परंतु या व्यवसायात दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. पशुखाद्याच्या किंमती पाहिल्या तर जास्त प्रमाणात पशुखाद्य देणे व्यवसायिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करुन कमीतकमी खर्चात अधिकाधिक दूध उत्पादन करणे आवश्यक आहे. यासाठी कमी खर्चात व चारा टंचाईत ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापर करता येईल. पशुखाद्यात ॲझोलाचा वापर केला तर असे खाद्य किफायतशीर व पौष्टिक बनते. दूध देणाऱ्या जनावरांना महागड्या खाद्याऐवजी ॲझोला खाऊ घातले तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढते. ॲझोला हे
खाद्य नेहमीच्या खाद्यापेक्षा खूप स्वस्त पडते.ॲझोला ही एक बहुगुणी चमत्कारिक वनस्पती आहे. तिचा प्रसार आणि लागवड वाढल्यास ती बहूपयोगी सिद्ध होऊ शकते. अवघे २ ते ३ सें.मी. आकाराची ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. दर दोन दिवसांनी दुप्पट होण्याची क्रिया सतत सुरू असते.

दुधाळ जनावरांसाठी अझोला

     जनावरांना सुलभतेने पचणारी उच्च प्रथिने आणि अझोला अन्य घन आहारात मिसळून किंवा नुसताच जनावरांना देता येतो; तसेच कोंबड्या, शेळ्या, मेंढया, डुकरे आणि ससे यांनाही देता येतो. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे अझोलाचे उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते. दुधाळ जनावरांवर केलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध झाले आहे की, जेव्हा जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत दीड ते दोन किलो अझोला दिला, तर दुधात दिवसाला दीड ते २ लिटर इतकी वाढ होते.अझोला हे कोंबडीचेही खाद्यान्न आहे. जर बॉयलर कोंबडीला अझोला दिला, तर तिच्या अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते.

उत्पादन /लागवडपद्धत
     अझोलाचे उत्पादन घेण्यासाठी ५o टक्के शेडनेटचा वापर करून किंवा झाडाच्या सावलीमध्ये जमिनीत १० फूट लांब, ५ फूट रुंद व ९ इंच खोल या आकाराचा वाफा तयार करावा. यानंतर वाफ्याचा पृष्ठभाग समपातळीत करुन घ्यावा. एका जनावराला दररोज दोन किलो या प्रमाणे अझोला खाऊ घालण्यासाठी असे दोन वाफे तयार करावे लागतील. झाडाच्या मुळ्या प्लॅस्टिक पेपरमध्ये जाऊन पेपर खराब होऊ नये, म्हणून खताच्या रिकाम्या गोण्यांचे आच्छादन वाफ्यामध्ये सर्व बाजूने टाकून यावरून प्लॅस्टिक पेपर टाकावा. यानंतर प्लॅस्टिक पेपरवरती सर्व बाजूंनी विटांचा थर द्यावा. वाफ्यामध्ये पावसाचे व इतर पाणी जाऊ नये, यासाठी पर्यायी चर काढून घ्यावेत. वाफा तयार झाल्यावर त्यात १o ते १५ किलो चांगल्या सुपीक काळया मातीचा थर टाकावा. यानंतर १० लिटर पाण्यात ३ ते ४ किलो न कुजलेले ताजे शेण, ३0 ते ४0 ग्रेम सुपर फॉस्फेट व ४० ग्रॅम खनिज मिश्रण टाकून एकत्रित चांगले मिसळून घ्यावे व तयार झालेले जीव मिश्रण खडड्यात अंथरलेल्या मातीवर ओतावे.यानंतर ६.५ ते ७.५ टक्के सामु असलेले स्वच्छ पाणी वाफ्यामध्ये जवळपास चार इंच ते पाच इंच उंचीपर्यंत साठवावे. याप्रमाणे तयार केलेल्या वाफ्यात एक ते दोन किलो ताजे व शुद्ध अझोलाचे कल्चर टाकावे. स्वच्छ सूर्यप्रकाश, २० ते २८ अंश से. तपमान, ७० ते ८० टक्के आद्रता आणि ६.५ ते ७.५ टक्के सामू असलेल्या पाण्यात अझोलाची चांगली वाढ होते व योग्य उत्पादन मिळते. जास्त क्षार असलेल्या पाण्यामध्ये अझोलाची वाढ होत नाही, म्हणून काळजी घ्यावी.अझोलाचे उत्पादन अझोला वनस्पतीचे पुनरुत्पादन हे लैंगिक व अलैंगिक अशा दोन्ही प्रकारे होत
असल्यामुळे पूर्णपणे वाफा तयार केल्यानंतर १०-१५ दिवसांत अझोलाची पूर्ण वाढ होऊन वाफा पूर्णपणे भरला जातो. वाफा पूर्णपणे भरल्यानंतर ३00-३५0 ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रति दिवस याप्रमाणात अझोलाचे उत्पादन मिळते. यानुसार एका वाफ्यातून १.५ ते २ किलो अझोलाचे उत्पादन घेऊ शकतो 

व्यवस्थापन कसे करावे 
     अझोलाची वाढ चांगली ठेवण्यासाठी दर आठ दिवसांनी एकदा १ ते १.५ किलो ताजे शेण, ५० ग्रॅम खनिज मिश्रण व ३० ग्रॅम सुपरफॉस्फेट पाण्यात एकजीव करून टाकत राहावे. दर १५ दिवसांनी वाफ्यातील २५ टक्के पाणी बदलून स्वच्छ पाणी ओतावे. नंतरच वरीलप्रमाणे मिश्रण पाण्यात मिसळावे दर २ महिन्यांनंतर वाफ्यातील ५० टक्के माती बद्दलून नवीन चांगली काळीं मातीं टाकावी. दर सहा महिन्यानंतर अझोलाचा वाफा स्वच्छ करावा. याप्रमाणे काळजी घेतली तर अझोलाचे चांगले उत्पादन मिळेल. तसेच वाफ्यातील पाण्याची पातळीं चार ते पाच इंच उंचीपर्यंत कायम ठेवावी, अझोलाचे रोगराई,किंडी, मुंग्या व वाळवी इत्यादींपासून संरक्षण करावे. परंतु रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नवीन कल्चर वापरून वाफा तयार करावा. वाफ्यातील अझोलाचे कल्चर दर सहा महिन्यातून बदलत राहावे.तसेच वाफ्यातून अझोला दररोज काढणे आवश्यक आहे. अन्यथा एकावर एक असे थर तयार होऊन रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रतिगादी दोन वेळा पाणी देऊन आठवड्यात अझोला गादी पूर्ण भरते.अझोला काढल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.ॲझोला सावलीत असताना पोपटी रंगाचा दिसतो व मोठा झाल्यावर हिरवा-करड्या रंगाचा दिसतो.

फायदे

 पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचत
 जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारून आयुष्य वाढते.
 अझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन यांत वाढ
 पक्षी (बदक, इमू, आदी) खाद्यात मिश्रणस्वरुपात अझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या
वजनात वाढ
 अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
 अझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी
वापरात येते.
 अझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शैवाल आहे. निळे–हिरवे शैवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगलेल्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्वे (अआणि ब) असेच क्षारतत्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
 अझोलामध्ये प्रथिनेचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १०-१५ टक्के खनिज व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो
आम्ल असतात. याचप्रमाणे ॲझोलामध्ये पिष्ठमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रा. प्रेरणा भास्कर अभंग, सौरभ सुभाष केदार,प्रा. घाडगे अश्विनी गणपती.
कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालये, लोणी

Sunday, April 7, 2019

Genetically Modified Crops ही पुर्णपणे शेतकर्‍याची फसवणूक (भाग-२)


    १.  ब्रिटनमध्ये Genetically Modified सोयाबीन पिकामामुळे मोठ्या प्रमाणात  Allergy निर्माण होताना निदर्शनास आले. आणि ब्रिटन शहरामध्ये झालेल्या परिणाम लक्षात घेता ब्रिटनने सोयाबीन पिकावर बंदी घातली.  शरीरावर होणारे दूषपरिणाम 
 
   २. जर्मनीमध्ये जेनेटिकली मोडीफाईड पिकाच्या सेवनाने १२ गायींना आपले प्राण गमवावे लागले.
पुरावा वाचण्यासाठी क्लिक करा.

   ३. Genetically modified Organisms हे पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले नसतात आणि निसर्गाला त्यापासून मोठा धोका आहे कारण US मध्ये  Genetically modified पिकांमुळे उत्पन्नामध्ये वाढ न होता पर्यावरणामध्ये मोठ्याप्रमाणात super weed  तयार झाले
US मध्ये वाढत असलेल्या Super Weed चा पुरावा.

 

Saturday, April 6, 2019

Genetically Modified Crops ही पुर्णपणे शेतकर्‍याची फसवणूक (भाग-१)


Must Read 

१. सन १९९५ मध्ये अमेरिका आणि व्हीयतनाम यांच्यामध्ये युद्ध झाले होते त्या युद्धाला व्हीयतनाम युद्ध म्हणतात वेळेस व्हीयतनामवर एक विषारी रसायन वापरले गेले होते त्याच नाव "Chemical Agent Orange" आणि ज्या कंपनीने ते विषारी रसायन बनवले होते तिचे नाव आहे "मोन्सेंटो" 
    सन १९४१ मध्ये एका कंपनीने विषारी वायु बनवला होता तो वायु हिटलर लोकांना मारण्यासाठी करायचा त्या वायु बनवर्‍या कंपनीचे नाव आहे "बेयर" 

  ह्या दोनच कंपन्या आहे मोठ्याप्रमाणात जगभरमध्ये Genetically Modified बियाणे पुरवतात, यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे विष बनवणार्‍या कंपन्या जे बियाणे बनवतात ते विषारीच असेल.. 
२. अमेरिकेमध्ये १९९० मध्ये L-ट्रीप्टोफॅन या हेल्थ टोनिक ने अनेक लोक मृत्यूमुखी पडले आणि खूप लोक अपंग झाले. जेनेटिकली मोडिफिकेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेल्या जपानी कंपनी शोवा डेनकोपरला 
अमेरिकेचे न्यायालयाने १० हजार करोड रुपयांच्या दंड ठोठवला. 
३.  २०१० मध्ये Genetically Modified food वर झालेल्या एका अभ्यासादरम्यान असे निदर्शनास आले की Genetically Modified food खाल्ल्याने उंदीरच्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतो आणि तो आपली पुढील पिढी निर्माण करू शकत नाही. थोडक्यात हाच परिणाम माणसांवर पण मोठ्या प्रमाणामध्ये व्यंध्यत्त्व निर्माण होईल 
४. गुजरातमध्ये आमरेली, सुरेंद्र्नगर, राजकोट येथे मोठ्याप्रमाणात BT कापूस पिकावला गेला, ३ वर्षांनंतर त्याच जमिनीवर हरभरा पीक लागवड केली पीक आले परंतु त्याच्या घाट्यामध्ये कुठल्याहीप्रकारे दाणे आढळून आले नाहीत. याच संशोधकांनी शोधलेले कारण आहे BT कापूस सर्वसाधारण कापसाच्या २ ते आडीच पट खोल जातो आणि मोठ्या प्रमाणात जमीनिमधील पोषक घटक काढून घेतो पर्यायाने जमीन नापीक बनते. 
५. शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे BT (Genetically Modified Crops) हे मोठे कारण आहे. बीटी कापूस boll worm resist झाल्याने  कंपनीने Ball-guard II चे संशोधन करून बाजारपेठेमध्ये आणले,त्याची किम्मतही दुप्पट होती, बियाणे वारंवार घावे लागतात आणि त्याची किम्मत खूप जास्त असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आणि शेतकरी आत्महत्या वाढलेले निदर्शनास आले. आणि सर्वात जास्त आत्महत्या ह्या कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या आहेत.

शेतकरी आता फसवणुकीला कंटाळलेत

कापूस उगवत नाही मग इतके महाग बियाणे का खरेदी करावे. 

संकलन आणि मांडणी 
सौरभ केदार 
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी 

मार्गदर्शन आणि सन्कल्पना
प्रा.सारिका फरगडे
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी 

Wednesday, January 30, 2019

लेट्यूस उत्पादन तंत्रज्ञान


लेट्युस उत्पादन तंत्रज्ञान




        पाश्चिमात्य देशामध्ये काही भाज्या न शिजविता कच्याच खाण्याची पद्धत आहे. अशा भाज्यांना सॅलड पिके म्हणतात. अशा कच्च्या भाज्या खाणे प्रकृतीला फारच हितकारक आहे. यापैकीच लेट्यूस हे पीक आहे. लेट्यूस ही पालेभाजी अमेरिका, यूरोपियन राष्ट्रे या देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे या भाजीचा फारसा प्रसार झालेला नाही. मोठ्या शहारच्या आसपास मर्यादित प्रमाणात स्थानिक ग्राहकांसाठी या भाजीची लागवड केली जाते.
      इतर पालेभाज्यांप्रमाणे या पालेभाजी मध्ये मोठ्याप्रमाणात पोषक अन्नघटक आहेत. जिवनसत्व अ सोबतच या पालेभज्यात प्रथिने तसेच खनिजे जसे- चुना, लोह इ. भरपुर प्रमाणात आहेत. विशेषत: ही कच्चीच सॅलड म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खातात. तसेच याची शिजवून भाजीही करतात. लेट्यूस या पालेभाजी सुट्ट्या पानाचा किंवा पानाच्या गुड्ड्यांचा (पान कोबीसारख्या) किंवा देठांचा भाग कच्चा(सॅलड) खाण्यासाठी वापर करतात. भारतात या पिकाचा तितकसा प्रसार झाला नाही. हळूहळू त्याचे महत्व पाट्वून बहुतेक राज्यांतून मर्यादित स्वरूपांत मोठ्या शहरांच्या परिसरात ही भाजी लावतात.

  हवामान आणि जमीन

     लेट्युस कोबिवर्गीय पिकांसारखेच थंड हवामानात येते. १३ ते १६ अंश सेल्सियस तापमान लेट्युस या पिकाला चांगले मानवते. यापेक्षा उष्ण व कोरड्या हवामानात पानांची प्रत  वाईट होवून ती कडवट होतात आणि पीक फुलावर लवकर येते. चांगला निचरा होणार्‍या, माध्यम व हलक्या माळरानच्या जमिनीत हे पीक चांगले येते.हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा चांगला पुरवठा करावा लागतो. या पिकासाठी जमिनीचा समु ५.५ ते६.७ असणे योग्य आहे.

उन्नत वान
  
 लेट्युस ह्या पिकच्या निरनिराळ्या प्रकारामध्ये गड्ड्यांचा प्रकार, पानांच प्रकार, सरल वाढणारा रोमेण प्रकार आणि खोडचा प्रकार असे चार प्रकार पडतात.
      गड्ड्यांचा गट : या गटात कोबी सारखे गड्डे तयार होतात त्यामुळे एका काढनीताच पण किंवा फुलकोबिसारखा गड्डा काढून घेतात. बाहेरच्या देशात विकसित केलेल्या आणि भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली, यांनी भारतात लागवडीसाठी शिफारस केलेल्या जाती पुदिलप्रमाणे आहेत.
१.        ग्रेट लेक : ही गड्डा प्रकारातील जात आहे. गड्डा घट्ट आणि मोठा असतो. पाने हिरवी असतात. बाहेरच्या पानावर फोडसारखे उंचवटे असतात. शेंडा करपणे( टिपबर्न) या रोगला ही जात कमी बळी पडते. पण यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. उत्पादन ६५ क्विंटल हेक्टरी तर बियाण्याचे हेक्टरी १-२ क्विंटल उत्पादन येते.
२.       इम्पेरियल : या वानामध्ये गड्डा मध्यम आकाराचा व घट्ट असून तो बाहेरील पानांनी बराचसा झाकला जातो. पानावर फोडसारखे उंचवटे असतात. ही जात अधिक तापमानात तग धरू शकते.
सुट्ट्या पानांचा गट: या गटात पाने लांबट व झाडावर सुट्टी(वेगवेगळी) आलेले असतात. ही पानेच खुडुन विक्रीला पाठवितात. पानांची तोडणी एकापेक्षा जास्त वेळा होवू शकते. या गटातील आपल्याकडे लागवडीसाठी शिफारस केलेलयालया जाती,
१.        स्लोबोल्ट : ही सुट्ट्या पानाची किंवा बिनगड्ड्यांची  जात आहे. पाने रुंद असून कडा झालरीसारख्या दिसतात . पानाचा रंग पोपटी असतो. ही जात लवकर फुलावर येत नाही, त्यामुळे परसबागेत लावण्यासाठी उत्तम आहे
२.       चायनीज यल्लो  : ही सुट्ट्या पानाची लवकर येणारी जात असून पाने फिकट हिरवी, कुरकुरीत आणि कोवळी असतात. ही लवकर येणारी व भरपूर उत्पन्न देणारी पांढर्‍या बियांची जात आहे. उत्पन्न ६०-६५ क्विंटली प्रती हेक्टर आणि बियांण्याचे उत्पन्न हेक्टरी २ क्विंटल येते.

लागवडीचा हंगाम आणि बियाण्याचे प्रमाण
    लेट्युस हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे बियांची पेरणी सप्टेंबर-अक्टोंबर मध्ये गादी वाफ्यावर करून ४ते ५ आठवड्यांनी रोपांची पुनर्लागवड करावी. रोपांना रोपवाटिकेत नियमित पाणी आणि खते द्यावीत. १ हेक्टर लागवडीसाठी लेट्यूसचे ५०० ग्राम बी लागते.

लागवड पद्धती

शेत नागरून, वखरुण भुसभुशीत झाल्यावर त्याला सेंद्रिय खते आणि पाणी देवून वापसा आल्यावर दुसर्‍यादिवशी लेट्युसची लागवड ३०-४५ सेमी अंतरावर ओळीत करावी दोन ओळीतील अंतर ६० सेमी अंतर ठेवावे.

खते आणि पाणी व्यवस्थापन

 मशागतीच्या वेळी २०-३० टन सेंद्रिय(शेणखत) खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. हेक्टरी ५० ते ८० किलो नत्र, २५ ते ५० किलो स्फुरद ५० ते ६० किलो पालाश द्यावे, तसेच लागवडीच्यावेळी संपूर्ण स्फुरद,पालश आणि  अर्ध नत्र द्यावे. तर नत्राचा निम्मा हप्ता नंतर १ महिन्यांनी द्यावा. या पिकाला १२ ते १५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे, उन्हे तापू लागल्यास लवकर लवकर पाणी द्यावे. सुरूवातीला हलक्या खुरपणी देवून तन काढावे व भर द्यावी.

महत्वाच्या किडी,रोग आणि त्यांचे नियंत्रण:

लेट्युस या पिकावर काही किडींचा जसे मावा, तुडतुडे आणि पाने पोखरणारी आळी (लीफमायनर) यांचा प्रादुर्भाव होतो. यासाठी मॅलॅथिऑन २० मिलि. १० लीटर पाणी या प्रमाणात फवारावे. औषध फवारल्यावर ८-१० दिवसांनी काढणी करावी.
  लेट्यूस या पिकावर पुढील रोग येतात,
१.        स्लायमी सॉफ्ट rot: यात पानावर तेलकट, फुगिर सडके डाग दिसतात. नंतर ते तपकिरी होवून सर्वत्र पसरतात आणि तेलकट बुळबुळीत वाटतात.
उपाय: जमिनीत बेताचा ओलावा ठेवल्यास हा रोग आटोक्यात राहतो.
२.       केवडा( डाऊनी मिल्ड्यु) :  यात पानांच्या खालच्या भागात केवड्यासारखी पांढरी वाढ झालेली दिसते. पानाच्या वर फिक्कट पिवळे चट्टे दिसतात. नंतर पाने पिवळी पडून वळतात.
उपाय: डायथेन एम-४५ या औषधाची १० लिटरला २५ ग्रामप्रमाणे फवारणी द्यावी  किंवा बोर्डो मिश्रण (२:२:५०)फवारावे
३.       मोझ्याक : हा विषाणूजन्य रोग रोपवाटिकेत दिसून येतो. पानाच्या कडा किंचित आतल्या बाजूला वळलेल्या तसेच पानावर पिवळे हिरवे चट्टे दिसतात. व रोपे पिवळी पडतात.

काढणी,उत्पादन आणि विक्री

  लेट्युसच्या पानांसाठी लावलेल्या जातींची पाने वाढलेली पण कोवळी असतानाच काढवीत. पानांचे २-३ तोडे घ्यावे. गड्ड्याच्या जातीमध्ये मात्र गड्डा पूर्ण वाढीचा झाल्यावरच तो काढतात. काढताना बाहेरच्या पानांना इजा होणार नाही ही काळजी घ्यावी. कारण ती फारच लुसलुशीत असतात.त्वरित विक्रीसाठी पाठवावे. लेट्युसच्या पानांची काढणी ५० दिवसांनी सुरू करावी तर गड्डा लेट्युस १००-१२० दिवसांनी काढतात.हेक्टरी १००ते १४० क्विंटल उत्पादन मिळते.
   झाडांची कापणी जमिनीलगत करतात.म्हणजे सर्व पाने एकत्रित राहतात.त्यांच्या जुडया बांधून विक्रीला पाठवतात. 0 अंश सेल्सियस तापमानवर आणि ९०-९५% आद्रता(हयुमिडिटी) असणार्‍या शितगृहात २-३ महीने लेट्युस साठवून ठेवता येते.
बिजोत्पादन
लेट्युस हे स्वपराग सिंचित (सेल्फ पोलीनेटेड)पीक आहे. याच्या पायाभूत बिजोत्पादनासाठी ५० मीटर तर प्रमाणित बियांसाठी १० मीटर अंतर दोन जातींत ठेवावे. भाजीसारख्याच पद्धतीने बिजोत्पादन घेता येते. गड्डे धरणार्‍या जातींमध्ये गड्ड्यांना थोडे कापावे लागते किंवा हातांनी वरची पाने काढावी लागतात म्हणजे फुलांचे सोट बाहेर पडतात. फळ- बोंड विटकरी रंगाचे(ब्राऊन)होते,तेव्हा बी काढावे. गड्ड्यांच्या जाती १००-१२५ किलो बियाण्यांचे उत्पादन देतात.तर सुट्ट्या पानाच्या जातीपासून अधिक म्हणजे ४-५ क्विंटल हेक्टरी बी मिळते.



   




प्रा. अश्विनी गणपती घाडगे, सौरभ सुभाष केदार, प्रा. प्रेरणा भास्कर अभंग 
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी
७९७२३८२७८९, ९११२७७५८७५